मालेगांव प्रतिनिधी | एस. सावंत
दिल्ली येथील जंतर मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जच्या आज मालेगाव-अर्धापूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या आवाहनाला प्रतिसाद देत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय नेते व नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. सकाळपासूनच मालेगाव येथील मुख्य बाजारपेठ, सर्व दुकाने, व्यावसायिक आस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या. "विद्यार्थ्यांवर दडपशाही खपवून घेणार नाही" "विद्यार्थ्यांवर लाठ्या चालवणे ही लोकशाहीची हत्या आहे."लाठीचार्ज करणाऱ्या दोषींवर कारवाई करा" अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.





Social Plugin