Ticker

6/recent/ticker-posts

“वचनाशी प्रामाणिक राहणारे खंबीर नेतृत्व: स्व. अजितदादा पवार” – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुशराव देशमुख यांचे प्रतिपादन



रिसोड प्रतिनिधी:

स्थानिक उत्तमचंद बगडिया महाविद्यालयात स्व. अजितदादा पवार यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व आदरयुक्त वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांनी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री. अंकुशराव देशमुख यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. "स्व. अजितदादा पवार हे दिलेला शब्द पाळणारे, प्रशासनावर मजबूत पकड असणारे आणि जनसेवेला सदैव प्राधान्य देणारे खंबीर नेतृत्व होते," असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भषणात केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून स्व. दादांच्या सामाजिक, शैक्षणिक व जनसेवेतील मोलाच्या योगदानाचा गौरव केला. त्यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीतून आणि उत्तुंग कर्तृत्वातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी, प्रमुख पाहुणे अंकुशराव देशमुख, प्रा. टिकार, डॉ. मेश्राम, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. राम जुनघरे, डॉ. बुधवंत, प्रा. डॉ. वानखेडे, प्रा. नांदेश्वर, डॉ. मनवर, डॉ. नरवाडे, डॉ. काळे, प्रा. प्रजापती, श्री. ओंकार पुरी, प्रा. संदीप जुनघरे, प्रा. बाजड, प्रा. राऊत, प्रा. वाघ, प्रा. पाठक, प्रा. पांढरे, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच श्री. गोपाल कोल्हे, संतोष घुगे, महेश पांडे, गजू जाधव, सुनील चराटे, श्रीमती नरवाडे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. खेडेकर यांनी केले, तर प्रा. अमरदीप साबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतीस अभिवादन करून, त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढे नेण्याच्या संकल्पाने कार्यक्रमाची सांगता झाली.