Ticker

6/recent/ticker-posts

निढळ येथे २९ जुलैला 'श्री गुरुपौर्णिमा उत्सवा'चे आयोजन



सव्वा लाख मंत्रांचे हवन ; महाअभिषेक

बुध  दि [प्रकाश राजेघाटगे ]

आषाढ शुद्ध पौर्णिमेनिमित्त अर्थात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून निढळ  येथील  श्री स्वामी समर्थ  सेवा केंद्र, प्रधान दरबार यांच्या वतीने बुधवार, दि. २९ जुलै रोजी  सकाळी ६ ते रात्री ८वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या गुरुपौर्णिमा उत्सवात भाविक व सेवेकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

उत्सवाची सुरुवात सकाळी ६ वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची महापूजा व महाअभिषेकाने होणार आहे. त्यानंतर सकाळी ८ वाजता स्वामींची भूपाळी आरती होईल. सकाळी ९ वाजता तब्बल १ लाख २५ हजार श्री स्वामी समर्थ मंत्रांचे हवन करण्यात येणार आहे. सकाळी १०.३० वाजता स्वामींची महानेवैद्य आरती व आरतीनंतर हरीष सुस्पे(दादा) यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे. सकाळी ११.३० वाजता श्री स्वामी चरित्र सारामृत हवन, सायंकाळी ५ वाजता श्री औदुंबर प्रदक्षिणा, तर सायंकाळी ६ वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची महानेवैद्य आरती होणार आहे. रात्री ८ वाजता गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता होईल.

उत्सवाच्या निमित्ताने सकाळी ८ वाजताच्या भूपाळी आरतीनंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुपद प्रत्यक्ष स्वामींच्या मूर्तीत घेण्याचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा रात्री ८ वाजेपर्यंत खुला राहणार आहे.हा कार्यक्रम हनुमान विद्यालय शेजारी श्री स्वामी समर्थ प्रधान दरबार  निढळ येथे होणार आहे.