Ticker

6/recent/ticker-posts

तरुण वयात यशाचे शिखर! वयाच्या २२ व्या वर्षी डिजिटल मीडियाचा मालक, पत्रकार आणि शिक्षक; अभिषेक ठेंगडे यांचा प्रेरणादायी प्रवास



पळसवाडी (खुल्ताबाद):

 "इच्छा तिथे मार्ग" आणि "जिद्द असेल तर वयाचं बंधन नसतं" हे केवळ सुविचार नसून, ते प्रत्यक्ष जगात खरे करून दाखवले आहे पळसवाडी येथील एका २२ वर्षीय तरुणाने. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी एमएस-सीआयटी (MSCIT) केंद्राचा मालक, एक यशस्वी उद्योजक, शिक्षक, निष्पक्ष पत्रकार म्हणून ओळख निर्माण करणारे अभिषेक सुभाष ठेंगडे आजच्या तरुण पिढीसाठी एक आदर्श आणि मोठे प्रेरणास्थान बनले आहेत.

पळसवाडी (ता. खुल्ताबाद) सारख्या ग्रामीण भागातून पुढे येत अभिषेक यांनी निर्माण केलेला हा प्रवास अत्यंत थक्क करणारा आणि तरुणांना नवी दिशा देणारा आहे.

शिक्षणासोबतच उद्योजकतेचा पाया

अभिषेक ठेंगडे यांचे प्राथमिक आणि उच्च शिक्षण अत्यंत मेहनतीने झाले. त्यांनी आधी आयटीआय (ITI Electrician) पूर्ण केले आणि सध्या ते कोहिनूर कॉलेज, खुल्ताबाद येथून आपले बी.एस्सी (B.Sc.) चे शिक्षण पूर्ण करत आहेत. शिक्षण घेत असतानाच केवळ नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा काहीतरी उद्योग सुरू करावा, या विचारातून त्यांनी ग्रामीण भागातील तरुणांना संगणक साक्षर करण्यासाठी पुढाकार घेतला. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी स्वतःचे MSCIT केंद्र सुरू करून एक यशस्वी तरुण उद्योजक म्हणून पाऊल ठेवले. आज त्यांच्या या उपक्रमामुळे परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना दर्जेदार डिजिटल शिक्षण मिळत आहे.

'शिक्षक' ते उद्योजक'

अभिषेक यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची अध्यापनाची आवड. ते स्थानिक शाळेत मराठी आणि हिंदी विषयांचे शिक्षक म्हणून कार्यरत असून, विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यात नैतिक मूल्ये रुजवण्याचे काम करत आहेत.

ग्रामीण भागातील एका सामान्य कुटुंबातून येऊन, वयाच्या २२ व्या वर्षी उद्योजक, शिक्षक, अशी कामगिरी करणाऱ्या अभिषेक सुभाष ठेंगडे यांचा हा प्रवास निश्चितच महाराष्ट्रातील लाखो तरुणांना प्रेरणा देणारा आहे.

"वय किंवा तुमची पार्श्वभूमी कधीच तुमच्या स्वप्नांच्या आड येत नाही. जर तुमच्याकडे जिद्द, कठोर परिश्रम करण्याची तयारी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची भावना असेल, तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकता." ( अभिषेक ठेंगडे)