Ticker

6/recent/ticker-posts

आषाढी एकादशीनिमित्त अपेक्स इंग्लिश स्कूलमध्ये चित्रकला स्पर्धाचे आयोजन


अंभई | दत्ता पवार

 आषाढी एकादशीनिमित्त सिल्लोड तालुक्यातील पांगरी येथील अपेक्स इंग्लिश स्कूलमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक डी. के. जाधव यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी डी. के. जाधव, डी. बी. पवार, ए. एस. भिवसने, ए. डी. अंभोरे यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते