देवगड प्रतिनिधी अमोल शिर्के महाराष्ट्र ग्रामीण न्युज
ज्या मातीत आपण जन्मलो ज्या देशाने आपल्याला आपली ओळख दिली त्या आपल्या भारत मातेच्या चरणी आपले मनःपूर्वक नमन. असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागामुळे आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत या बलिदानाला आमचे शतसा नमन. आपला देश स्वातंत्र्य होऊन हा 80 वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा अतिशय उत्साहात व आनंदाने साजरा करताना आपले देशवासीय बांधव आपणास आज दिसून आलेले आहेत. कोकणात देवगड येथे सर्व सरकारी कार्यालय अतिशय उत्साहाण आणि व आनंदाने त्याच प्रमाणे या भागातल्या शाळा, कॉलेज, व्यापारी महासंघ, रिक्षा, टेम्पो,युनियन व अनेक सामाजिक कार्यालय व अनेक खाजगी ठिकाणे या ठिकाणी 15 ऑगस्ट चा हा शुभ दिन झेंडावंदनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात व अतिशय आनंदाने सर्व आपल्या देश बांधवांनी साजरा केलेला आहे. तिरंगा फडकवताना अनेक ठिकाणी मान्यवरांनी व प्रमुख पाहुण्यांनी या झेंडावंदन या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवलेली गेलेली आहे. अनेक ठिकाणी 15 ऑगस्ट 2026 या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम ठीकठिकाणी विजयदुर्ग किल्ल्यामध्ये लेझीम ढोल पथक यांचे कार्यक्रम ठेवण्यात आले. देवगड तालुक्यात सर्व सरकारी कार्यालय व मुख्य पोलीस स्टेशन येथे झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. तसेच विजयदुर्ग पोलीस ठाणे येथे सुद्धा झेंडावंदनाचा कार्यक्रम पोलीस निरीक्षक प्रदीप शिंदे यांच्या हस्ते साजरा करण्यात आला. 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करतो तेव्हा या स्वातंत्र्यासाठी ज्या हुतात्म्याने जे बलिदान दिलेले आहे देशासाठी जे शहीद झालेले आहेत अशांना मनःपूर्वक श्रद्धांजली व देशातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात शांती, आनंद, आरोग्य, आणि सुख नांदो ही ईश्वरचरणी प्रार्थना जय हिंद जय भारत





Social Plugin