तामसा( गुलाबचंद अग्रवाल महाराष्ट्र ग्रामीण न्युज प्रतिनिधी 15/08/2026)
आज 80वा स्वातंत्र्य दिन श्री दिगंबर स्वामी प्रा.शा.तामसा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, ध्वजारोहण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. गणेशराव सोळंके सर यांच्या हस्ते करण्यात आले.या निमित्तशाळेचे माजी विद्यार्थी व व्यापारी श्री सारंग शेठ लाभशेटवार यांनी सर्व 475 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप केले. बुलढाणा बँक शाखा तामसा चे मॅनेजर श्री जिरवणकर साहेब यांच्या वतीने खाऊ वाटप केले .तिरुपती इलेक्ट्रॉनिक तामसा चे श्री प्रमोद कोडगिरे यांच्या वतीने led TV Smart शाळेस भेट दिली. श्री ओम शेठ डोणगावे यांनी पण 11 हजार रुपये चे साहित्य भेट दिले.
आदर्श मनोहर माळगे या विद्यार्थ्याचा शिष्यवृत्तीधारक झाल्यामुळे सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री पंडितराव पाटील व श्री डॉ सोळंके साहेब, श्री विश्वंभर परभणकर, श्री अनंतराव भोपळे, श्री नामदेवराव बाऊलकर सर, श्री प्रभाकर महाजन, श्री गणपतराव हाणवते , श्री बालाजीराव कोठोळे, श्री हवगिरराव दयाडे हे सर्व संचालक तसेच श्री संतोष शेठ निलावार बरालिंग देवस्थान समिती अध्यक्ष,माजी सरपंच श्री खंडेराव आगलावे, श्री श्रीपाद लाभशेटवर व मोठ्या प्रमाणात पालक मंडळी व विद्यार्थी उपस्थित होते.
राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, साक्षरतेची शपत, आणि तंबाखू मुक्त महाराष्ट्र शपथ घेण्यात आली.





Social Plugin