Ticker

6/recent/ticker-posts

मराठा सेवा संघ तालुका रिसोड तर्फे सन्मान सोहळ्याचे आयोजन



प्रतिनिधी विजय गायकवाड

       रिसोड :-  मराठा सेवा संघ रिसोड तालुका तर्फे रिसोड तालुका अध्यक्ष शिवश्री शिवाजीराव कव्हर यांच्या निवासस्थानी नवनियुक्त केंद्रप्रमुख, प्राचार्य, मुख्याध्यापक, गुणवंत विद्यार्थी,पत्रकार व समाज प्रबोधन करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

          शिक्षण, प्रशासन, पत्रकारिता आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी मराठा सेवा संघ, रिसोड तालुक्याच्या वतीने विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा बालाजी सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष शिवश्री बाबारावजी साहेब खडसे पाटील व तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मॅडम यांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

              यावेळी केंद्रप्रमुख म्हणून नियुक्त झालेल्या शिवश्री साईनाथ शिंदे, प्रशांत मोरे, उमाकांत काष्टे, अमोल बोडखे, वैभव बिल्लारी, अमरदीप बिल्लारी व प्रदीप सदार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्राचार्यपदी नियुक्त झालेले शिवश्री जानराव देशमुख, रामेश्वर पंडित व विलासराव रहाटे आणि उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून निवड झालेले शिवाजीराव देशमुख व पंकज देशमुख यांचाही गौरव करण्यात आला. आयआयटी-एनआयटीसह वैद्यकीय क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या यशाची विशेष दखल घेत आयआयटी इंदोरसाठी निवड झालेल्या आर्यन विजयराव बोरकर, एनआयटी सुरतसाठी निवड झालेल्या अर्जुन विजयराव साखरे, कमिन्स कॉलेज पुणे येथे निवड झालेल्या कु. मानश्री सारंगधर शिंदे तसेच एमबीबीएस साठी निवड झालेले पार्थ गायकवाड व संदेश संतोष अंभोरे यांचा गुणगौरव करण्यात आला.

         भारत सर्च टॅलेंट एक्झाममध्ये महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक मिळविल्या बद्दल शिवांश चवरे तसेच एलएमएलयू, नागपूर येथे एलएलबीसाठी निवड झाल्या बद्दल कु. तेजस्विनी साहेबराव जाधव तसेच सर्व शिक्षा अभियानामध्ये कायम स्वरूपी निवड झाल्याबद्दल सुनील दाभाडे, संजय साखरकर,भागवत मापारी व सौ. सुनीताताई विजयराव बोरकर यांचा गौरव करण्यात आला. इंग्रजी विषयात डॉक्टरेट प्राप्त केल्याबद्दल प्रा डॉ तुळशीराम भोयर  यांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रशासकीय कामातील उल्लेखनीय कार्याबद्दल रिसोड तालुक्यात एसआयआरचे काम सर्वप्रथम करणाऱ्या शिवमती सौ किरणताई शिवाजीराव कव्हर व शिवश्री शिवाजीराव कव्हर यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. समाजातील प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकार बांधवांचाही या सोहळ्यात गौरव करण्यात आला. व्हॉइस मीडिया जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विनोद पाटील बोडखे तसेच उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अर्जुन पाटील खरात यांचा सन्मान करण्यात आला. आपल्या लेखणीतून विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आणि शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांवर प्रभावी लेखन करून समाजजागृती करणारे शिवश्री दिलीपराव भिसडे यांचाही सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. लेखणी ही केवळ शब्दांची मांडणी नसून समाजाला दिशा देणारे प्रभावी माध्यम असल्याचे या सन्मानातून अधोरेखित झाले. या कार्यक्रमाचे आयोजन मराठा सेवा संघाचे रिसोड तालुकाध्यक्ष शिवश्री शिवाजीराव कव्हर यांच्या पुढाकाराने व मराठा सेवा संघाच्या शिलेदारांच्या संकल्पनेतून करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवश्री दिलीप भिसडे व आभार प्रदर्शन शिवश्री विजयराव बोरकर यांनी केले. यावेळी रिसोड व परिसरातील पूर्ण मराठा सेवा संघाचे पदाधिकारी व इतर सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.