Ticker

6/recent/ticker-posts

माता व बाळ मृत्यू प्रकरण; दोन डॉक्टर, दोन रुग्णवाहिका चालक निलंबित


 सोनपेठ /प्रतिनिधी (शिवशंकर तुपकर )

येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात शनिवारी(दि. ८) सायंकाळी दाखल करण्यात आलेल्या गर्भवती माता मरजीनाबी अमिन शेख आणि तिच्या पोटातील बालकाच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणात गठीत करण्यात आलेल्या सात सदस्यीय चौकशी समितीने रुग्णालय, संबंधित डॉक्टर, राष्ट्रीय ॲम्बुलन्स सेवा संबंधित कंत्राटी कंपनी आणि मयत रुग्णाच्या नातेवाईकांच्या सखोल चौकशीनंतर या प्रकरणातील राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा कंपनीतील दोन  रुग्णवाहिका चालक केशव यादव व मोहम्मद जलाल आणि रुग्णालयातील डॉ. अभिजीत इप्पर, डॉ. कुलदीप चोरमले या डॉक्टरांना तात्काळ निलंबित केले आहे.