Ticker

6/recent/ticker-posts

गोदावरीचे बंधारे ९०% भरले, पण माजलगाव धरण १९ टक्क्यांवरच; उपसा सिंचन योजनेला गती कधी मिळणार?


 सोनपेठ / प्रतिनिधी 

 माजलगाव धरणापर्यंत ही एक उपसा सिंचन योजना आहे. परंतु ही सिंचन योजना अद्यापही अपूर्णच आहे. ही जर आज घडीला पूर्ण असतील तर माजलगाव धरणामध्ये गोदावरी पात्रातून पाण्याचा विसर्ग करण्यास सोपा झाला असता. त्याचबरोबर आज घडीला माजलगाव धरण 19% पर्यंत आहे ते कदाचित ३० ते ४० टक्के पर्यंत पोहोचले असते. लोणी सावंगी ह्या ठिकाणावरून हा उपसा सिंचन योजना माजलगाव धरणापर्यंत मंजूर आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून हे काम कासव गतीने सुरू असल्याने त्याचा परिणाम आज धरणावर होत आहे. कारण जायकवाडीच्या धरणातून गोदावरी त पाण्याचा विसर्ग करण्यात आला. 

गोदावरी पात्रावर उभारण्यात आलेले सर्व बंधारे जवळपास 90% पर्यंत भरले आहेत. यामुळे ठिकाणाहून माजलगाव धरणापर्यंत पाण्याचा विसर्ग सहज आणि सोप्या पद्धतीने झाला असता. आज ह्या उपसा सिंचन योजनेला गती मिळणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जर पाहिलं तर माजलगाव धरणातून प्रामुख्याने माजलगाव शहरासह बीड शहराला व 11 ग्रामपंचायतला नियमित पाणीपुरवठा होतो.परळी तालुका, सोनपेठ तालुका, गंगाखेड तालुका जे कालव्या अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीला,जाणवरांना,पाणी मिळते परंतु त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार, , आमदार   यांनी देखील लक्ष देणे खूप गरजेचे आहे.