Ticker

6/recent/ticker-posts

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी व स्वातंत्र्य दिनानिमित्त 'महात्मा फुले विशेष' वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न ग्रामगीताचार्य नारायणराव मांडवकर यांच्या वाढदिवसानिमित्त वैचारिक जागर.



मुन्ना यांनी ग्रामीण प्रतिनिधी 

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य, स्वातंत्र्य दिन तसेच ग्रामगीताचार्य नारायणराव मांडवकर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, महिला, युवक व गुरुदेव भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी ग्रामगीताचार्य नारायणराव मांडवकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन व सत्कार करण्यात आला.

वक्तृत्व स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार, त्यांचे शैक्षणिक व सामाजिक क्रांतीतील योगदान आणि राष्ट्रसंतांची ग्रामगीता या विषयांवर आपले प्रभावी विचार मांडले. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून नव्या पिढीने सत्यशोधक व ग्रामकल्याणकारी विचारांची कास धरावी, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गुरुदेव मानव बहुउद्देशीय संस्था, श्री गुरुदेव सर्वांगीण बालसंस्कार शिबिर समिती, वणी तालुका गुरुदेव सेवा मंडळ तसेच भारत कारडे (मध्यवर्ती प्रतिनिधी व अन्नदान समिती सदस्य, श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी) आणि सर्व गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता सामुदायिक प्रार्थनेने झाली.