प्रतिनिधी/ गणेश जाधव. जामनेर. वडगाव तिघ्रे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव तिघ्रे येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन करत शाळा आणि गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
या परीक्षेत इयत्ता ४ थी मधील विद्यार्थिनी स्नेहल जितेंद्र सुरळकर (१६८ गुण), वैष्णवी श्रीराम सुरळकर (१६४ गुण) आणि मिनल मनोज ब्राम्हदे (१५८ गुण) यांनी उत्कृष्ट गुण मिळवून यश मिळवले. तसेच इयत्ता ७ वी मधील विद्यार्थिनी कु.अर्पिता अरुण ब्राम्हदे (१८६ गुण) आणि कु.भाग्यश्री नवल सोनवणे (१८० गुण) यांनी घवघवीत गुण मिळवून शाळेचा आणि गावाचा नावलौकिक वाढवला.
🌟 यशाचे मार्गदर्शक
विद्यार्थ्यांच्या या यशामागे इ.४ थी चे वर्गशिक्षक,श्री. संजय देवरे सर व इ.७ वी चे वर्गशिक्षक श्री योगेश चवरे सर शिक्षकांचे नियोजनबद्ध प्रयत्न आणि विद्यार्थ्यांचे सातत्य यांमुळेच हे यश शक्य झाल्याचे व्यक्त होत आहे.तसेच श्री. जितेंद्र पवार सर यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना गटशिक्षणाधिकारी आ.श्री.काळे साहेब ,शिक्षण विस्तार अधिकारी श्री. संजय पाटील साहेब, केंद्र प्रमुख श्री. नितीन पाटील सर, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती (SMC) अध्यक्षा सौ. कल्पना सोनवणे, पाणी पुरवठा कर्मचारी गृप (ग्रामपंचायत नागण खुर्द-वडगाव तिघ्रे) , भाऊराव सोनवणे महाराज, पालक आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले असून पुढील शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत





Social Plugin