Ticker

6/recent/ticker-posts

विजयदुर्ग पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप शिंदे यांची नियुक्ती



 देवगड प्रतिनिधी अमोल शिर्के  महाराष्ट्र ग्रामीण न्युज 

 आपणास असे कळविण्यात येते की विजयदुर्ग पोलीस ठाणे हद्दीतील सर्व स्थानिक व ग्रामस्थ आणि पोलीस दलातील पोलिसांना सहकार्य करणारे दक्ष नागरिक यांना असे सुचित करण्यात येते की विजयदुर्ग पोलीस ठाणे या क्षेत्रातील पोलीस ठाण्याचा पदभार नवीन पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप शिंदे साहेब यांनी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेला असून त्यांचे मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन विजयदुर्ग ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात आलेले आहे. तसेच जुने सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. संजय कातिविले साहेब यांची बदली आचरा पोलीस ठाणे हद्दीत झालेली असून श्री संजय कातीवले साहेबांना त्यांच्या पुढील सेवा प्रवासासाठी विजयदुर्ग स्थानिक ग्रामस्थ व सागर रक्षक दल, होमगार्ड, पोलीस मित्र,जीव रक्षक, दल पोलीस पाटील, व पोलिसांना सहकार्य करणारे समाज बांधव यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. व तसेच नवीन पदभार स्वीकारलेले विजयदुर्ग पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक कर्तव्यनिष्ठ श्री.प्रदीप शिंदे यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा