Ticker

6/recent/ticker-posts

नेरमध्ये विकासकामांचा धडाका: लक्ष्मी मंदिर ते स्मशानभूमी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ



बुध  दि [प्रकाश राजेघाटगे ] 

नेर ता. खटाव येथील ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी लक्षात घेऊन,  नेर येथे लक्ष्मी मंदिर-मातंग वस्ती ते स्मशानभूमी या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाचा भव्य शुभारंभ करण्यात आला.  प्रदेशाध्यक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून या कामासाठी २५ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असून, भूमिपूजनानंतर कामाला तात्काळ सुरुवातही झाली आहे.

या विकासकामाचे उद्घाटन आमदार शशिकांत शिंदे यांचे सुपुत्र साहिल बाबा शिंदे यांच्या शुभहस्ते, अत्यंत उत्साही आणि उत्सवी वातावरणात संपन्न झाले. याप्रसंगी नारळ वाढवून आणि विधिवत पूजा करून कामाची सुरुवात करण्यात आली.

या उद्घाटन समारंभाला साई दुर्गा पॅनलचे सर्व कार्यकर्ते, मोरया ग्रुपचे सर्व कार्यकर्ते, तसेच सुप्रसिद्ध हॉटेल साईशचे मालक संजयशेठ चव्हाण, माजी सरपंच रुपेश चव्हाण, रोहन चव्हाण, आणि गावातील इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या महत्त्वाच्या रस्त्यामुळे ग्रामस्थांची मोठी सोय होणार असून, नेर ग्रामस्थांच्या वतीने आमदार शशिकांत शिंदे आणि साहिल बाबा शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. या विकासकामाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.