Ticker

6/recent/ticker-posts

कर्तव्य बजावत असताना .शेलूसर ता. चिखली येथील पॅरा कमांडो हरिदास कापसे शहीद!!



मन्सूर शहा.धोत्रा.भ.चिखली.:----प्राप्त माहितीनुसार उंचावरील (हाय अल्टीट्यूड) भागात पोस्टींग असतांना प्राणवायू कमी पडल्याने हृदयविकाराच्या झालेल्या त्रासामुळे मूळ बॉम्बे इंजिनिअरींग पुप युनिटचे व सध्याचे ४११ (स्वतंत्र) पॅरा फिल्ड कंपनी आग्रा येथे सेवेत असणारे हवालदार हरिदास मधुकर कापसे यांना प्राण गमवावे लागले. मृत्यूसमयी त्यांचे वय २६ वर्षांचे होते. ते चिखली तालुक्यातील शेलसूर येथील मूळ रहिवासी आहेत. क्रांतीदिनाच्या पूर्वसंध्येलाच ही दुःखद वार्ता जिल्ह्यात येवून धडकली, तर क्रांतीदिनाच्या दिवशी त्यांच्या पार्थीवावर चिखली येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे

शेलूसर ता. चिखली येथील व सध्या दांडगे ले आऊट चिखली येथे राहणारे हरिदास मधुकर कापसे है हवालदार म्हणून पॅरा फिल्ड कंपनीत कर्तव्यावर होते. 

अशितव्यावर असतांना 'प्राणवायू' अभावी गेला प्राण !

शहीद हरिदास मधुकर कापसे यांचे पार्थीव उत्तराखंड वरुन दिल्लीला आणले जात असून रविवार ९ ऑगस्टला दुपारी १.५० वाजता ते विमानाने निघणार असून छत्रपती संभाजीनगरला ३.५० वाजता पोहचेल. त्यानंतर ते छावणीत घेवून जातील. तेथे मानवंदना दिल्यानंतर बायरोड पार्थीव अंत्यसंस्कार दिवस व वेळ अद्याप ठरलेला नाही. ऑगस्ट २०२६ रोजी त्यांची नियुक्ती लापथल पोस्ट येथील हार्डन्ड भूमिगत बंकरच्या बांधकामाच्या कामावर होती. कर्तव्यावर असतांना सायंकाळी ५ वाजता त्यांना उलटी झाली, त्यानंतर ते चालत ५ वाजून २५ मिनीटांनी मेडीकल इन्स्पेक्शन रुममध्ये आले. तेथे त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात येवून औषधोपचार देण्यात आले आणि पुढील १ तास म्हणजे ६.३५ मिनीटापर्यंत त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले.

हवालदार हरिदास कापसे हे नंतर सायंकाळी ७. ३५ वाजता पुन्हा इयुटीवर जात असतांना त्यांना चक्कर आली. ते कोसळले व बेशुध्द झाले. तारकाळ त्यांना गढ़ त्यांना ७.३७ वाजता पुन्हा मेडीकल इन्स्पेक्शन राममध्ये आणण्यात आले, त्यावेळी ते धापा टाकत होते. आयएमओ यांनी तातडीने वैद्यकीय उपचार सुरु करुन त्यांना

वाचविण्यासाठी आपातकालीन पुनरुज्जीवनाचे प्रयत्न केले.

त्यांना सीपीआर, हाय फ्लो ऑक्सीजन तसेच आपातकालीन इंजेक्शन देण्यात आले, मात्र त्यानंतरही त्यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली व ७ऑगस्ट रोजी रात्री ८. २६ वाजता त्यांना मृत घोषीत करण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थीव जोशीमठ येथे पहाटे ३.३० वाजता आणण्यात आले. या घटनेची माहिती ८ ऑगस्टला सकाळी त्यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आली. त्यावेळी शेलसूर व चिखली परिसरावर एकच शोककळा पसरली.

शहीद हवालदार हरिदास मधुकर कापसे यांच्या मातोश्रीचे ३ महिन्यापुर्वीच निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी व २ भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे. घटनेने शोककळा पसरली आहे.