प्रतिनिधी @समाधान भुतेकर
स्थानिक स्व. हुकूमचंदजी कोटेचा, सहकार विद्या मंदिर दे. मही येथे स्वातंत्रदिन अतिशय उत्सहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी प्रथमतः सैनिक चेके साहेब जे सीमेवर देशरक्षणासाठी कार्यरत आहेत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये स्कॉलरशिप परीक्षामध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुष्पगुछ व बक्षीस देण्यात आले तर इयत्ता दहावी मधून प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक आलेल्या विदयार्थी व पालक यांचा विशेष सत्कार मान्यवराच्या हस्ते व व्यंकटेश अर्बन बँकच्या वतीने करण्यात आले.स्काऊट गाईडच्या विदयार्थ्यांनी मेजर अशोक चेके सर यांच्या मार्गदर्शनात सुंदर असं पदसंचालन करत राष्ट्रध्वजाला व प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. प्राध्यापक कमलेशजी खिल्लारे यांनी आपल्या शैलीत विद्यार्थ्यांना महापुरुषांची कार्य व स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व पटवून दिले.तर विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनावर आपले विचार व्यक्त केले व चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली महापुरुषांच्या वेशभूषेत आलेल्या चिमुकल्यांनी मान्यवरांची मनमोहुन टाकले तर मुलींनी भुतेकर मॅडम व देशमुख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतवर आयोजित कार्यक्रमात देशभक्तीपर गीतावर सुंदर नृत्य सादर केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री प्रकाश इंगळे सर यांच्या मार्गदर्शनात पार पडला यावेळी व्यासपीठावर प्राध्यापक कमलेशजी खिल्लारे, डॉक्टर गोडे मॅडम, डॉक्टर दंदाले सर, डॉक्टर दंदाले मॅडम, पत्रकार अमोल बोबडे, शेतकरी नेते मुंडे साहेब, कोटेचा साहेब, कोठारी साहेब बुलढाणा अर्बनचे शिंगणे साहेब, सहकार विद्या मंदिर चे मुख्याध्यापक सन्माननीय इंगळे सर, पर्यवेक्षक आप्पाराव खेडेकर सर, उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तर श्री शेळके सर व आंधळे सर यांनी मनमोहक असे फलकलेखन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव तळेकर सर तर आभार प्रदर्शन श्री शिवशंकर शिंगणे सर यांनी केले.





Social Plugin