Ticker

6/recent/ticker-posts

सरपंच सतीश पाटील भुतेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन


प्रतिनिधी @समाधान भुतेकर 

 स्थानिक ईसरूळ येथील लोकनियुक्त सरपंच तथा चिखली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष श्री सतीश पाटील भुतेकर ज्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुठल्याही गोष्टीचा थाटमाट न करता गरजू रुग्णांसाठी भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन केले. यामध्ये शेकडो रुग्णांवर विविध चाचण्या व त्यावर उपचार करण्यात आले. व गरजवंतांना मोफत चष्म्याची वाटप करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील नामवंत डॉक्टर्स राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष पत्रकार भिकन पाटील भुतेकर सामाजिक कार्यकर्ते पप्पू पाटील भुतेकर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होती यावेळी वयोवृध्यानी उपचार घेत. सतीश पाटील भुतेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दीर्घ आयुष्यासाठी आशीर्वाद दिले.