Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकार बालासाहेब शिंदे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर


अतनूर / प्रतिनिधी

महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्याकडून दरवर्षी प्रमाणे यंदाही प्रस्ताव मागवण्यात आले व राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय व राज्य आणि गाव पातळीवर, ग्रामस्तरावर ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन तथा ग्राहक चळवळीचे कार्यकर्ते आणि उत्कृष्ट पत्रकारिता क्षेत्रातील योजनेंतर्गत सन २०२५-२६ मधे नि:स्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे या दृष्टीने राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली. हा पुरस्कार जळकोट तालुक्यातील अतनूर येथील गेल्या ३० वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी दैनिक पुण्यनगरी चे पत्रकार संजय ऊर्फ बालासाहेब गोविंदराव शिंदे यांना जाहीर करण्यात आला असल्याचे सतिशकुमार रामराव बुरगुटे (सरकार), संस्थापक-अध्यक्ष, जिव्हाळा प्रतिष्ठान व स्वामिनी फाऊंडेशन यांनी नियुक्ती पत्राद्वारे कळविले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शिंदे यांचे काैतुक केले आहे.

हे पुरस्कार वितरण जिव्हाळा प्रतिष्ठान, स्वामिनी फाऊंडेशन, ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 'राज्यस्तरीय पत्रकारिता व ग्राहक चळवळीचे कार्यकर्ते - २०२६' राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात बुधवार दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वा.ओम मंगल कार्यालय बार्शी-तुळजापूर रोड, उपळे (दुमाला) ता. बार्शी जि. सोलापूर होणार आहे. या पुरस्काराचे वितरण तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष निलेश देठे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थितीत एफ.आर.शेख तहसीलदार, बार्शी, ॲड. राहुल तुळशीदास झालटे, अध्यक्ष वकिल संघ, बार्शी, मुस्ताक मिस्त्री प.महाराष्ट्र अध्यक्ष, ग्राहक समिती, उमाकांत ढावारे (तालुकाध्यक्ष, जिव्हाळा प्रतिष्ठान, बार्शी, प्रा. इंद्रजीत पाटील, प्रसिध्द लेखक, साहित्यीक, अमुल कादबाने पोलीस निरीक्षक, वैराग, निलेश अठवले, पुरवठा निरीक्षक अधिकारी, बार्शी, बालासाहेब शिंदे मराठवाडा अध्यक्ष, ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य स्वप्निल बुरगुटे, तालुका उपाध्यक्ष, जिव्हाळा प्रतिष्ठान, बार्शी, तात्यासाहेब रोडे, प्रदेश युवकाध्यक्ष, ग्रा.स. महा.राज्य यास्मिन शेख, सरकारी कामगार अधिकारी, बार्शी, तानाजी गुंड, संस्थापक अध्यक्ष ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य, संतोष कोल्हाळ, सोलापूर जिल्हाध्यक्ष, ग्राहक समिती, प्रा.राजेश पुजारी, सामाजिक कार्यकर्ते, उपळे (दु.), शिवाजी दांगट, धाराशिव जिल्हाध्यक्ष, ग्राहक समिती, सतिशकुमार रामराव बुरगुटे (सरकार), संस्थापक-अध्यक्ष, जिव्हाळा प्रतिष्ठान व स्वामिनी फाऊंडेशन, रामेश्वर बुरगुटे, उपसरपंच, उपळे(दु.), लखन भालेराव, तात्यासाहेब भालेराव, अमोल भालेराव, किशोर बुरगुटे, दादा खांडेकर, विशाल बुरगुटे, दत्ता कसबे, मन्सुर अत्तार, मेसा भालेराव, याकुब आवटे, नागनाथ पवार, रामेश्वर जगदाळे, महादेव चव्हाण, जनक कुरुंद, महादेव भिसे, आण्णा वाघमारे, मसा पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शिंदे यांचे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक आणि ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते, विविध सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन संस्था समिती घ्या वतीने अभिनंदन व कौतुक केले जात आहे.