सोनपेठ : प्रतिनिधी ( शिवशंकर तुपकर )
दि. 14-08-2026 तालुक्यातील प्रमुख केंद्र असलेल्या ग्रामीण रुग्णालय सोनपेठच्या वैद्यकीय अधीक्षकपदाची जबाबदारी डॉ. भारत चव्हाण यांनी स्वीकारली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय परभणी यांच्या आदेशानुसार डॉ. चव्हाण यांच्याकडे वैद्यकीय अधीक्षक पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे.
ग्रामीण रुग्णालय सोनपेठ येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉ. विठ्ठल कराड यांची प्रशासकीय कारणास्तव बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी डॉ. भारत चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार त्यांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. सोनपेठ तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहेत. त्यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय सेवा, प्रशासकीय कामकाज, रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा तसेच आरोग्य यंत्रणेतील समन्वय अधिक प्रभावी करण्याची मोठी जबाबदारी डॉ. चव्हाण यांच्यावर आली आहे. डॉ. भारत चव्हाण यांच्या रूपाने ग्रामीण रुग्णालय सोनपेठ ला नवे नेतृत्व मिळाले असून, त्यांच्या पद भारामुळे रुग्णालयाच्या प्रशासकीय कामकाजाला आणि आरोग्य सेवेला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा तालुक्यातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. महाराष्ट्र ग्रामीण न्युज चे प्रतिनिधी शिवशंकर तुपकर यांनी भेटून त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या
.jpg)




Social Plugin