Ticker

6/recent/ticker-posts

पाटील कॉलेज मधील विद्यार्थिनी कु अर्चना नवले यांना पीएच डी पदवी.



प्रतिनिधी:- विजय आर गायकवाड

रिसोड : येथील स्व.पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. अर्चना सुभाष नवले ( बदर) यांनी रसायनशास्त्र विषयात पीएच डी पदवी यशस्वीरित्या संपादन करून महाविद्यालयाच्या शैक्षणिक इतिहासात नवा मानदंड निर्माण केला आहे.

कु.अर्चना सुभाष नवले (बदर) यांनी "सिंथेसिस, कॅरेक्टरायझेशन अँड बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन ऑफ सम न्यू 1,2,3-ट्रायझोल मॉलिक्युलार हायब्रीड्स" या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले. त्यांना डॉ. के.एफ.शेळके यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातून Ph.D. पदवी प्राप्त करणाऱ्या त्या प्रथम विद्यार्थिनी ठरल्या असून, त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या संशोधन कार्याचे परीक्षक व तज्ज्ञांनी कौतुक केले.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्था अध्यक्ष मा.श्री बाबाराव पाटील साहेब, सचिव मा.श्री अमित पाटील साहेब, माजी प्राचार्य डॉ. जे.बी. देव्हडे, महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.एम.एन.गायकवाड, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, संशोधक विद्यार्थी तसेच कुटुंबीयांनी कु. अर्चना नवले यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थिनीने Ph.D. पदवी संपादन केल्याने महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.