Ticker

6/recent/ticker-posts

यावल तालुक्यात सैय्यद शहजादा याकूत मोहम्मद जर्ताज शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम मिळवले , तब्बल ८५.३३ गुण



प्रतिनिधी आरिफ खान 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे च्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२६    मध्ये यावल तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी सैय्यद  शहजादा याकूत मोहम्मद जर्ताज यांनी ८५.३३ गुणांसह दैदीप्यमान  यश संपादन केले सैय्यद  शेहजादा याने सर्व आव्हानांवर  मात करत यावल तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला असून त्याच्या या यशाने संपूर्ण जळगांव  जिल्ह्यात कौतुकाच्या वर्षाव आहे 

 नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतिम निकालानुसार सैय्यद  शेहजादा याने सुरुवातीपासूनच अभ्यासात सातत्य राखले होते अत्यंत  नियोजनबद्ध अभ्यास , शिक्षकांचे अचूक मार्गदर्शन आणि पालकांच्या पाठिंबामुळे त्याने या कठीण परीक्षेत यावल तालुक्यात प्रथम स्थान मिळवले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी योग्य दिशा आणि मेहनत घेतली तर ते कोणत्याही स्तरावर यश मिळू शकतात हे सैय्यद  शहजादा याने८५.३३ गुणांची कमाई करून सिद्ध केले आहे त्याच्या या  घवघवीत   यशाबद्दल यावल तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रासह राजकीय व सामाजिक स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे .जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ मारूळ चे मुख्याध्यापक, सर्व  शिक्षक वृंद    सर्व  ग्रामस्थांच्या वतीने सैय्यद  शहजादा याच्या आणि त्यांच्या पालकांच्या जाहीर सत्कार  करण्यात आला .