Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षणमहर्षी डॉ .बापूजी साळुंखे यांचा स्मृतिदिन उत्साहात साजरा .


बुध   दि [प्रकाश राजेघाटगे ]

 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित श्री नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर बुध मध्ये बापूजी साळुंखे याचा स्मृतिदिन साजरा करून अभिवादन करण्यात आले . विद्यालयाचे प्राचार्य श्री अंकुश भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे  समितीचे संकल्प  ,संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ .बापूजी साळुंखे यांचा 39 वा स्मृतिदिन ढोल ताशाच्या गजरात , डॉ.बापूजी साळुंखे व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांची भव्य मिरवणुक काढण्यात आली . बापूजीच्या जयघोषाने व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या जयघोषाने विद्यार्थी यांनी बुध परिसर दणाणून सोडला . शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व माजी अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांनी डॉ. बापूजी साळुंखे, स्वामी विवेकानंद व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन केले यावेळी पर्यवेक्षक श्री नाना दडस  , तानाजी पाटील , संजय माने , विशाल नाळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षिका यांनी देखील अभिवादन केले तसेच विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी देखील प्रतिमांची पूजन करून अभिवादन केले .यावेळी चंद्रकांत चव्हाण सर यांनी शिक्षण महर्षी डॉ . बापूजी साळुंखे यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य याबद्दल आपल्या मनोगतामध्ये विस्ताराने त्यांचे कार्य चा गुणगौरव सांगितला .यावेळी विद्यालयातील शिक्षक संताजी देसाई यांनी देखील बापूजींचे बालपण व संस्थेची माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच नाना दडस  यांनी देखील बापूजींच्या कार्याचा आढावा विद्यार्थ्यांना सांगितला .यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बापूजी व श्री स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये रिया जगदाळे ,पार्थ जाधव, प्रथमेश बोराटे ,शौर्य जगताप ,श्रेया कुंभार, स्वरा जगताप , विराज पाटोळे, सनम मोमीन, प्रांजल नलवडे ,अर्णव घाटगे, शर्वरी मदने, कृष्णा क्षिरसागर  ,रणवीर घाटगे , साईराज घाटगे, आरोही बोराटे ,संस्कार खवळे ,अर्णव फरकुटे यांच्या भाषणाचे नियोजन विद्यालयातील सहशिक्षिका सौ चंदा वाईकर यांनी केले . विद्यालयातील विद्यार्थी पृथ्वीराज मेळावणे यांने डॉ बापूजी साळुंखे, देवांश जगदाळे यानी स्वामी विवेकानंद , व समिक्षा चव्हाण यांनी संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या वेशभूषा केल्या होत्या .विद्यालयातील सहशिक्षक श्री भगवान सरवदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार नवनाथ काळे यांनी मानले यावेळी विद्यालयातील प्राध्यापक श्रीनिवास शिंदे  , अमित राऊत सर  ,नितीन नारगुडे तसेच शिक्षिका संध्याराणी बोराटे  , आश्विनी माने मॅडम, फरिन सय्यद मॅडम, वहिदा मोमीन मॅडम , शिवानी पाटोळे मॅडम शिक्षकेत्तर कर्मचारी महादेव खोमणे , गोविंद बोराटे व विकास कांबळे हे देखील उपस्थित होते . तसेच कार्यक्रमासाठी इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतची विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .