Ticker

6/recent/ticker-posts

ज्ञानसाधना शिक्षण संस्था तसेच बेंबळा पाटबंधारे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरुदेव पाणी वापर संस्था बरडगाव चे प्रशिक्षण



 ग्रामीण प्रतिनिधी राळेगाव 

 दिनांक 30 7 2026 ला ज्ञानसाधना शिक्षण संस्था तसेच बेंबळा पाटबंधारे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरुदेव पाणी वापर संस्था बरडगाव चे प्रशिक्षण घेण्यात आले त्या दरम्यान प्रशिक्षणाला पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष स्वप्निल जुमनाके व सचिव श्री रुपेश म्हैस्कार तसेच संचालक मंडळ हे उपस्थित होते  त्याचप्रमाणे श्री गुरुदेव पाणी वापर संस्थेचे संपूर्ण लाभार्थी तसेच ज्ञान साधना शिक्षण संस्था येतील प्रशिक्षिका प्रीती थुल मॅडम व सह प्रशिक्षक आशिष लांबाडे सर हे उपस्थित होते प्रीती थुल मॅडम यांनी महिला समभाव व महिला सक्षमीकरण यावर माहिती सांगत असताना त्यांनी पाणी वापर संस्थेमध्ये महिलांचे काय महत्त्व आहे त्यांचा सहभाग कसा महत्त्वाचा आहे याविषयी माहिती दिली त्यामध्ये पाणी वापर संस्थांमध्ये महिलांचा प्रभाव वाढणार; 'वार्षिक लैंगिक समानता आणि संवेदनशीलतेवर'  व्यवस्थापन समिती अधिक पारदर्शक, सक्षम आणि समावेशक बनवण्यासाठी शासनाकडून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. आता ग्रामीण भागातील 'पाणी वापर संस्थां'मध्ये (Water User Associations) महिलांचा प्रभावी सहभाग सुनिश्चित करण्यासाठी विशेष 'वार्षिक लैंगिक समानता योजना' (Annual Gender Equality Plan) आणि 'लैंगिक संवेदनशीलता' (Gender Sensitization) उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

​पाण्याचा सर्वाधिक वापर आणि व्यवस्थापन घरात महिलांकडूनच केले जाते, परंतु निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग नगण्य असतो. हीच दरी भरून काढण्यासाठी  प्रशिक्षणामध्ये महिला सक्षमीकरण व महिला समभाव या विषयावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

​📌 प्रशिक्षणाचे प्रमुख वैशिष्ट्ये आणि उद्दिष्टे:

​निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग: पाणी वापर संस्थांच्या बैठकांमध्ये महिलांना केवळ नाममात्र न ठेवता, पाण्याचे वाटप, कर वसुली आणि दुरुस्तीच्या कामांच्या निर्णयांमध्ये त्यांना समान अधिकार दिले जातील.

​वार्षिक लैंगिक समानता योजना (Gender Equality Plan): प्रत्येक पाणी वापर संस्थेला दरवर्षी आपल्या कार्यक्षेत्रात महिलांच्या सहभागाचा आढावा घेणारा वार्षिक आराखडा तयार करावा लागेल.

​लैंगिक संवेदनशीलता कार्यशाळा (Sensitization Workshops): संस्थेतील पुरुष सदस्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये महिलांच्या योगदानाबद्दल आदर व संवेदनशीलता वाढवण्यासाठी विशेष प्रशिक्षण आणि कार्यशाळांचे आयोजन केले जाईल.

​नेतृत्व विकास (Capacity Building): महिला सदस्यांना पाणी व्यवस्थापन, तांत्रिक बाबी आणि हिशोब ठेवण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून त्या आत्मविश्वासाने संस्था चालवू शकतील.

पाण्याचे नियोजन आणि बचत यामध्ये महिलांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. पाणी वापर संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढल्यास पाण्याचा गैरवापर टाळण्यास मदत होईल आणि ग्रामीण भागात जल व्यवस्थापन अधिक पारदर्शक होईल. 

भविष्यातील बदल 

या निर्णयामुळे केवळ पाण्याचे योग्य वाटप होणार नाही तर ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण होऊन त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक दर्जातही मोठी सुधारणा दिसून येईल आगामी काळात योजनेची अंमलबजावणी सर्व पाणी वापर संस्थांमध्ये सक्तीची केली जाणार आहे अशा पद्धतीने संपूर्ण पाणी वापर संस्थेला प्रीती थुल मॅडम यांनी माहिती दिली. प्रशिक्षणाला जास्तीत जास्त महिला उपस्थित होत्या आणि त्यांनी खूप चांगली माहिती मिळाली याबद्दल त्यांनी ज्ञानसाधना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय मनीष भानवे सर यांचे आभार मानले तसेच प्रोजेक्ट्स मॅनेजर मेघावत सर यांचे सुद्धा आभार मानले संस्थेच्या प्रशिक्षिका प्रीती थुल मॅडम यांचे सुद्धा आभार  मानले त्याचप्रमाणे बेंबळा पाटबंधारे विभाग यांची सुद्धा त्यांनी आभार मानले व व प्रशिक्षण चांगल्या प्रकारे पार पडले.