Ticker

6/recent/ticker-posts

अनुसूचित जातीतील अ, ब, क, ड उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद



७ ऑगस्टच्या हदगाव मोर्चासाठी शिवपुरी, चिकाळा व घोगरी येथून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार

हदगाव, प्रतिनिधी : विठ्ठल कदम शिवपुरीकर.

दि.०२ ऑगस्ट २०२६ अनुसूचित जातीतील अ, ब, क, ड उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, हदगाव यांच्या वतीने शिवपुरी, चिकाळा व घोगरी येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला विशाल भालेराव, आमोल रावळे आणि बौद्धिवृक्ष कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या विरोधातील आगामी आंदोलनाची दिशा, समाजाची भूमिका आणि ७ ऑगस्ट २०२६ रोजी हदगाव येथे होणाऱ्या मोर्चाची तयारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी संविधानाने दिलेल्या समान हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सर्व आंबेडकरी समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी उपस्थितांनी सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, समाजबांधव, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी आझाद चौक, हदगाव येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीदरम्यान शिवपुरी, चिकाळा व घोगरी येथील समाजबांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. समाजाच्या एकजुटीच्या बळावर हा लढा अधिक प्रभावीपणे उभा राहील, असा विश्वास उपस्थित वक्त्यांनी व्यक्त केला.

बैठकीच्या शेवटी सर्वांनी एकमताने दि. ०७/०८/२०२६ रोजी हदगाव येथे होणाऱ्या मोर्चात गावागावातून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा संकल्प केला. तसेच प्रत्येक गावातून जास्तीत जास्त समाजबांधवांना मोर्चात सहभागी करून घेण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहनही करण्यात आले.