प्रतिनिधी : ओंकार पुरी
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून तसेच 'घर घर तिरंगा' या देशव्यापी मोहिमेअंतर्गत स्थानिक उत्तमचंद बगडिया कला व वाणिज्य महाविद्यालयात 'वंदे मातरम्' या विषयावर आधारित भित्तिचित्र (Wall Painting) स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचा राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रमोद कुमार नंदेश्वर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी 'वंदे मातरम्' या संकल्पनेवर आधारित अत्यंत प्रभावी आणि देशभक्तीपर भित्तिचित्रे साकारून आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताचे योगदान आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रमोद कुमार नंदेश्वर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारतीय स्वातंत्र्यलढा आणि 'वंदे मातरम्' या मंत्राने स्वातंत्र्यसैनिकांना दिलेली प्रेरणा यावर सविस्तर प्रकाश टाकला.
या उपक्रमाला महाविद्यालयातील प्रा. टिकार, प्रा. बुधवंत, प्रा. वानखेडे, प्रा. खेडेकर, प्रा. मेश्राम, प्रा. वानरे, प्रा. काळे, प्रा. मनवर, प्रा. नरवाडे, प्रा. प्रजापती तसेच श्री. ओंकार पुरी यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन राष्ट्रीय सेवा योजना आणि राज्यशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले.





Social Plugin