Ticker

6/recent/ticker-posts

खटाव तालुक्यातील पुसेगावच्या स्वराज चव्हाणची उजबेकिस्तान आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड



बुध  दि [प्रकाश राजेघाटगे] 

पुसेगाव, ता. खटाव येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव संचलित  डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मीडियम स्कूल, पुसेगाव येथील इयत्ता 10 वी चा विद्यार्थी स्वराज गजानन चव्हाण याची उज्बेकिस्तान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

     स्वराजने राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत घवघवीत यश मिळवून ही निवड पटकावली आहे. खेळाबरोबरच अभ्यासातही तो हुशार असून शाळेचे व तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. विघ्नहर्ता रियल इस्टेट संचालक गजानन चव्हाण यांचा चिरंजीव असून त्यांचे सहकारी ॲड. विशाल पाटील, सह सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

      त्याच्या या यशाबद्दल शाळेत  मंगळवार  रोजी झालेल्या पहिल्या पालक सहविचार सभेत त्याचा शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

       या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव , सचिव श्री मोहनराव जाधव , एस. आर. पाटील सर, प्रशासकीय अधिकारी श्री डी. पी. शिंदे सर,तपासणी प्रमुख अधिकारी के. डी. पवार सर, संस्था सदस्य जयंतराव जाधव अण्णा, मुख्याध्यापिका धनश्री पोतदार मॅडम, पर्यवेक्षक ठोंबरे सर ,  व राजापूरचे माजी सरपंच श्री राजेंद्र घाडगे आणि सर्व शिक्षक व पालक उपस्थित होते. 

      स्वराजच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. त्याने पुढेही  स्कूलचे देशाचे नाव उज्ज्वल करावे अशा शुभेच्छा सर्व मान्यवरांनी दिल्या.