प्रतिनिधी - विजय गायकवाड
रिसोड :- येथील स्व पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ एम एन गायकवाड, मा प्राचार्य डॉ जे बी देव्हडे (उशिकाअ)यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रंथालयशास्त्राचे (के.आर.सी.) विभाग प्रमुख प्रा डॉ विजय आर गायकवाड यांच्या नियोजनात ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ शियाली रामामृत रंगनाथन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी सुरुवातीला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ एम एन गायकवाड यांनी डॉ रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ एम एन गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की "डॉ रंगनाथन यांनी भारतात ग्रंथालय चळवळ सक्रिय केली. ग्रंथ, वाचक व ग्रंथपाल या त्रिमूर्तीचे एकत्रिकरण म्हणजेच खरे ग्रंथालय. या त्यांच्या विचारांची पूर्तता करण्यासाठी दरवर्षी त्यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो, हेच त्यांचे स्मरण आहे." तर ग्रंथालयशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ विजय आर गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की "विद्यार्थी आणि पुस्तके यांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे व अनन्यसाधारण आहे. पुस्तके ही विद्यार्थ्यांची खरी व पक्की मित्र असतात, जी त्यांना केवळ शिक्षणातच नव्हे तर आयुष्यभर योग्य मार्ग दाखवतात, ज्ञान देतात आणि त्यांचा बौद्धिक व मानसिक विकास घडवून आणतात. पुस्तकांमधून विद्यार्थ्यांना इतिहास, विज्ञान, आणि जगाची नवीन माहिती मिळते. नियमित वाचन केल्याने मेंदू तल्लख होतो आणि एकाग्रता वाढते. चांगल्या पुस्तकांच्या वाचनाने मनाला शांतता मिळते आणि अभ्यासामधील ताण कमी होतो. यासाठी विद्यार्थ्यांनी सतत वाचन केले पाहिजे, हीच खरी आजच्या डॉ रंगनाथन यांना जन्म दिवसाची भेट राहील" असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी हजर होते. कार्यक्रमाची प्रस्तावना कु शिवानी बिल्लारी, सूत्रसंचलन कु नाजीया देशमुख तर आभार रामप्रसाद ढोले या विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमासाठी श्री जगदीश बोडखे श्री पंजाबराव सुर्वे यांनी परिश्रम घेतले.





Social Plugin