बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकांचा आढावा घेऊन यशोदा चॅरिटेबल ट्रस्ट (रेवलकरवाडी, ता. खटाव, जि. सातारा) यांच्या वतीने दिला जाणारा २०२६ चा 'युवा नेता सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार' कोल्हापूरचे नगरसेवक श्री. ऋतुराज राजेश क्षीरसागर यांना जाहीर झाला आहे. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री. हरिदास अर्जुन जगदाळे यांनी ही घोषणा केली.
नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर हे उच्चशिक्षित असून त्यांनी सामाजिक क्षेत्रात आपल्या विविध उपक्रमांद्वारे विशेष ठसा उमटवला आहे. तरुण पिढीला सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेत त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत.
त्यांच्या प्रमुख सामाजिक कार्याचा आढावाआरोग्य व सामाजिक उपक्रम यामध्ये मोफत रक्तदान शिबिरे, व्यसनमुक्ती व्याख्यान मालिका, गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी मदत.
महिला व बालविकास अंतर्गत कोल्हापूर येथे भव्य 'भगिणी महोत्सव', महिलांसाठी आरोग्य तपासणी, मोफत चष्मे वाटप शिबिर ,तसेच गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप. तरुणांसाठी रोजगार मेळावे, जिम व तालीम संघांना क्रीडा साहित्याचे वाटप. वृक्षारोपण मोहिमा, अन्नदान आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या जयंती-पुण्यतिथी व वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम सातत्याने राबवित आहेत.पश्चिम महाराष्ट्रात आणि कोल्हापूर परिसरात त्यांच्या या चमकणाऱ्या कामगिरीची दखल घेऊन यशोदा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्यांना हा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असल्याचे अध्यक्ष हरिदास जगदाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.





Social Plugin