Ticker

6/recent/ticker-posts

सौ.मंजुळाबाई महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे प्रा.विश्वंभर देवणे सेवानिवृत्त



ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर 

बिलोली तालुक्यातील ग्राम खतगांव येथील सौ.मंजुळाबाई ज्युनियर कॉलेज मधील अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक विश्वंभर गणपतराव देवणे शिराढोणकर हे प्रदीर्घ अध्यापन सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत.शिराढोण (कंधार)गावातून सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन प्रारंभिक शैक्षणिक प्रवास त्यांचा उल्लेखनीय प्रेरणादायी राहिला आहे.सौ.मंजुळाबाई उच्च माध्यमिक विद्यालयात अर्थशास्त्र विषयाचे विवेचनयुक्त अध्यापन ते करीत असत.क्लिष्ट,रटाळ अर्थशास्त्रातील संकल्पना सोप्या पद्धतीने ते विद्यार्थ्यांना उकलून सांगत असत. महाविद्यालयात शिस्तबद्ध वागणूकीवर देवणे सरांचा नेहमी प्रभाव असे.शिकवण्याची हातोटी मार्मिक मुलांवर संस्कार करणारी होती.त्यामुळेच आज घडीला सरांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. 

विद्यार्थीप्रिय,संस्कारशील,समजूतदार,विनयशील,मृदु स्वभाव, धीरगंभीर अर्थपूर्ण संवाद अशा अनेकविध गुणांनी परिपूर्ण असलेले गुणवंत,ज्ञानवंत प्राध्यापक  निवृत्त झाल्याने आजी माजी विद्यार्थी,पालक,सहकारी शिक्षकांच्या मनामनात आठवणरूपी भावनांचा उमाळा दाटून आलेला होता.सेवानिवृत्त निमित्ताने संस्था सचिव साहेब,अध्यक्ष,विद्यमान पदाधिकारी,साई शिक्षण मंडळातील समस्त प्राध्यापक,प्राध्यापिका,शिक्षक, शिक्षिका,पालक,देवणे कुटुंबीय,मिञ परिवारासह शिराढोण,कंधार,खतगांव,देगलूर गावातील प्रतिष्ठित गावकरी,आजी माजी विद्यार्थी अभिनंदन करीत आरोग्यदायी शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत.