Ticker

6/recent/ticker-posts

SIR 2026 EF डिजिटायझेशनमधील उत्कृष्ट कार्याबद्दल किसन शिंदे यांचा सत्कार



कैलास कोल्हे @ ग्रामीण प्रतिनिधी 

मंठा, दि. १७ ऑगस्ट २०२६ : निवडणूक विभाग, तहसील कार्यालय मंठा येथील किसन शिंदे यांनी SIR 2026 EF डिजिटायझेशन अंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा १५ ऑगस्ट २०२६ रोजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

किसन शिंदे यांनी SIR 2026 EF डिजिटायझेशनचे काम अत्यंत कार्यक्षमतेने व जबाबदारीने पूर्ण केल्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला. त्यांच्या उल्लेखनीय कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

या यशाबद्दल तहसीलदार सुमन मोरे, नायब तहसीलदार विष्णू पुरी, गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय क्षिरसागर, पर्यवेक्षक काशिनाथ राठोड, शिवाजी देशमुख, भगवान जायभाये, कैलास उबाळे आदींनी किसन शिंदे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.