Ticker

6/recent/ticker-posts

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य: वणी येथे दिव्यांगांसाठी विशेष 'रेल्वे सवलत पास' शिबिराचे आयोजन; ७५% पर्यंत सवलतीचा मिळणार लाभ.



 मुन्ना येरेकार ग्रामीण प्रतिनिधी वणी

दिव्यांग बांधवांना रेल्वे प्रवासादरम्यान मिळणाऱ्या सवलत पाससाठी अनेकदा रेल्वे कार्यालयाचे वारंवार फेरे मारावे लागतात. हा मनस्ताप आणि वेळ वाचावा, या उद्देशाने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 'लोकहित कल्याण सामाजिक व शैक्षणिक संस्था' यांच्या वतीने एकदिवसीय विशेष 'दिव्यांग रेल्वे सवलत पास कॅम्प'चे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष अनिकेत रेखा अनिल चामाटे यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून हे शिबीर पार पडणार आहे.


रेल्वे प्रवासात मिळणार ७५% पर्यंत सूट :-


या सवलत कार्डचा दिव्यांग प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळतो. रेल्वेच्या विविध श्रेणींनुसार तिकिटाच्या मूळ भाड्यात खालीलप्रमाणे सूट दिली जाते:


1) स्लीपर क्लास (Sleeper) आणि थर्ड एसी (3AC): तिकिट दरात ७५% सूट

2) फर्स्ट एसी (1AC) आणि सेकंड एसी (2AC): तिकिट दरात ५०% सूट


सोबतच्या सहाय्यकालाही (Escort) समान सवलत -

दिव्यांग व्यक्तीला प्रवासादरम्यान मदत करण्यासाठी सोबत राहणाऱ्या एका सहाय्यकाला (Escort/Attendant) देखील तितकीच सूट दिली जाते. म्हणजेच, दिव्यांग प्रवाशाला ७५% सूट असल्यास सोबतच्या सहाय्यकालाही ७५% सूट मिळेल.


शिबिरासाठी आवश्यक कागदपत्रे:

या शिबिराचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रांच्या छायांकित प्रती (Xerox) सोबत आणणे आवश्यक आहे:

1) दिव्यांग प्रमाणपत्र (Disability Certificate)

2) आधार कार्ड

3) यूडीआयडी कार्ड (UDID Card)

4) जन्माचा / वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला - T.C.)

5) पासपोर्ट साईज फोटो


आयोजकांचे आवाहन :-

वणी व परिसरातील सर्व दिव्यांग बांधव आणि गरजू प्रवाशांनी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


अधिक माहिती व संपर्कासाठी 

उपाध्यक्ष सचिन विठ्ठल राखुंडे आणि

सचिव मुन्ना विठ्ठल येरेकर यांच्याशी संपर्क साधावा.