Ticker

6/recent/ticker-posts

खंडाळ्याच्या शुभम गायकवाडची यशस्वी झेप


प्रतिनिधी :-विजय गायकवाड

खंडाळा :-  येथील रहिवाशी असलेले जि.प. प्रशाळेचे माजी आदर्श मुख्याध्यापक श्री रामराव शंकरराव गायकवाड यांचा नातू तथा उच्चशिक्षित असूनही केवळ नोकरीच्या मागे न लागता उत्तम शेती करणारे महाराष्ट्र शासनाचा आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त श्री शिवाजी शशिकला रामराव गायकवाड यांचा मुलगा शुभम शारदा शिवाजी गायकवाड याची गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुस्के केंद्र सुरजागड जिल्हा गडचिरोली येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नुकतीच नियुक्ती झाली. तसेही खंडाळा गावातील गायकवाड घराण्यातील मूल मुली हे डॉक्टर, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, इंजिनियर, तहसील विभाग, जि.प. विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, वकिली, बँकिंग सेक्टर या व इतरही सर्व क्षेत्रात प्रत्येक घरातील दोन दोन सदस्य सरकारी जॉब ला आहेत. एव्हढेच नव्हे तर गोरगरिबांना, मंदिराना, शाळेला दान देण्याच्या बाबतीत या घराण्याने सामाजिक वीण घट्ट विणलेली असुन फार मोठे योगदान हे घराणे आतापर्यंत देत आहे. या गावातील जमिनी तशा कोरडवाहू पण लोक खूप कष्टाळू आहेत. आपल्या मुलांना शिक्षण शिकविण्याचा कल या गावात खूप मोठ्या प्रमाणात आहे. शुभम ने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून हे यश संपादन केले असुन शेती करता करता अभ्यासाची जिद्द सोडली नाही. मधात कोव्हीड लॉकडाउन पासून भरती निघाली नाही. तरीही न डगमगता  एमपीएससी असो की ईतर स्पर्धा परीक्षा असो त्याने कठोर परिश्रम करून अभ्यासाची लिंक तुटू दिली नाही, त्याचेच हे फळ आज त्याला मिळाले. या त्याच्या यशाबद्दल त्याला विचारले असता "आमचा पूर्ण गायकवाड परिवार व नातेवाईक यांच्या संस्कारातून मी तयार झालो असून त्याचेच हे फलित होय" असे तो म्हणाला. या त्याच्या निवडीबद्दल पंचक्रोशीतील नातेवाईक, परिवार व मित्र मंडळी यांनी कौतुक केले असून पुढील विद्यार्थी हीताय कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या असून शुभम ने खंडाळा गावाचे नाव मोठे केले आहे.