Ticker

6/recent/ticker-posts

रामनगर येथे दरवर्षीप्रमाणे पोळा सण साजरा.



 गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 

       दि.१० सप्टेंबर ला रामनगर गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय जल्लोषात आणि उत्साही वातावरणात 'बैल पोळा' सण साजरा करण्यात आला!

संध्याकाळी संपूर्ण गावातून बैलांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील सर्व बाल-गोपाल, महिला व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. महिलांनी बैलांची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवला आणि त्यांच्या कष्टाप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

गावातील सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमुळे यंदाच्या पोळा सणाला एक वेगळाच जिव्हाळा आणि आनंदाचे उधाण आले होते.

          यावेळी गावाचे पोलीस पाटील श्री.सुर्यकांत जाधव नायक श्री.अमरसिंग राठोड,श्री.मनोहर पवार,श्री.धुपचंद राठोड, कारभारी श्री.अरविंद पवार श्री.दुर्गादास जाधव,श्री.संजय चव्हाण,श्री.दिलीप पवार डॉ.निलेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ता मयुर जाधव यांच्यासह सर्व शेतकरी बांधवाच्या उपस्थित बैल पोळा हा सण हराण टेकडी‌ या मैदानात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.