Ticker

6/recent/ticker-posts

पोंंभुर्णा येथे सौंदर्यीकरण कामाची मजुरी चा सात दिवसाचा अल्टीमेट




पोंभूर्णा तालुका प्रतिनिधी, अमीन मेश्राम 

दिं१७/०९/२०२६ इको पार्क पोंंभुर्णा येथे सौंदर्यीकरण कायम ठेवण्याच्या उद्देशाने संयुक्त वन व्यवस्थापन समिती चेक आष्टा यांच्या ठरावानुसार दिनांक १७ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२६ पर्यंत भर उन्हाळ्यात नियमितपणे काम केले आहे.आणि संपूर्ण इको पार्कचा परिसर स्वच्छ केला.

 परंतु केलेल्या कामाची मजुरीच्या बाबतीत विचारणा केली, तर सदर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ उत्तर देतात .की आजदेऊ उद्या देऊ निधी उपलब्ध नाही. परंतु शासनस्तरावरून डेव्हलपमेंट करण्यासाठी आजपर्यंत आलेला निधी गेला कुठे आज जवळ जवळ पाच महिने लोटले पाणी नाही पाऊस नाही कोरडा दुष्काळ पडला आहे. 

आम्हच्या आर्थिक अडचणीचा विचार करून संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची मजुरी लवकरात लवकर मिळवून द्यावी.अन्यथा केलेल्या कामाची मजुरी सात दिवसाच्या आत मिळाल्यास न आम्ही आंदोलन सुरू करणार असा काल दिनांक १६/९/२०२६ रोज बुधवार ला कडक इशारा निवेदनाद्वारे गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिलेला आहे.