Ticker

6/recent/ticker-posts

स्व. हुकूमचंजी कोटेचा सहकार विद्या मंदिर दे. मही च्या खेळांडुचा दणदणीत विजय



प्रतिनिधी @ समाधान भुतेकर

 युवक क्रीडा व सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय क्रीडा स्पर्धा 2026 .27 मध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा बुधवार दिनांक 16.9.2026 ला तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा सहकार विद्या मंदिर देऊळगाव मही येथे पार पडल्या यामध्ये 14 वर्षे मुली 17 वर्षे मुली आणि 17 वर्षे मुले यांची हॉलीबॉल या क्रीडा प्रकारामध्ये जिल्हास्तरावर पात्र झाले आहेत त्याचबरोबर कबड्डी स्पर्धेमध्ये 17 वर्षे मुलींचा संघ जिल्हास्तरावर पात्र झाला आहे या सर्व खेळाडूंचे बुलढाणा अर्बन चे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक भाईजी विद्यमान अध्यक्षा कोमल मॅडम व चीफ मॅनेजिंग डायरेक्टर सुकेशजी झंवर सर यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या विजयासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रकाश इंगळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर हे संघ यशस्वी होण्यासाठी क्रीडा शिक्षक श्री संतोष. गूमलाडू. सर श्री अशोक चेके सर मेजर त्याचबरोबर श्री गणेश चेके सर श्री प्रवीण खिल्लारे सर श्री नितेश पालवे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व बुलढाणा अर्बन परिवार यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या