Ticker

6/recent/ticker-posts

अयान आदमपूरकर चा प्रथम वाढदिवस शालेय साहित्य व वृक्ष भेट देऊन साजरा


महमदरफी  मदार आदमपूरकर, नांदेड.

आदमपूर,दि.१६ सप्टेंबर-

बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथील रहिवासी कवी,गीतकार,पत्रकार व वन्यजीव प्रेमी जाफर फक्रूशा आदमपूरकर यांचे सुपूत्र अयान आदमपूरकर च्या प्रथम वाढदिवसानिमित्त बुधवार दि.१६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता गरजू मुलांना शालेय साहित्य व वृक्षभेट देऊन हर्षोल्लासात साजरा करण्यात आला.

वाढदिवसानिमित्त आदमपूर ग्राम परिसरातील लहान मुला-मुलींना वही,पेन,चाॅकलेटसह वृक्षभेट देत निसर्ग संवर्धनाचा आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देण्याचा उद्देश यानिमित्ताने जाफर आदमपूरकर यांचा छोटासा उपक्रम सफल झाला.लहान मुलांनाही वनांचे महत्त्व समजावे,पर्यावरणाचा समतोल साधता यावा, रानावनातील पशु,पक्षी तथा मानवासाठी अनमोल असलेली गरज आदि बाबींचे महत्त्व अधोरेखित करून यासाठी पुत्र अयान च्या पहिल्या वहिल्या प्रकटदिनानिमित्त मदार आदमपूरकर दांपत्याने

मनात केलेला संकल्प पत्रकार गंगाधर पंगलवार, बालाजी नाईक,सचिन पाटील हांद्रे,पुंडलिक नाईक,भगवान उप्पलवार,रमाकांत मठपती,आजदिनी पूर्णत्वास गेला.

सदरील वाढदिवसानिमित्त ग्राम परिसरातील माणिकराव पाटील, ओमकार नाईक,अमोल नाईक, 

बालाजी डोईफोडे,संजय नागेश्वर, 

bh शेख महेबुब,निवृत्त सहाय्यक फक्रूशा मदार,बिस्मिल्लाबी मदार,जाफर आदमपूरकर,सना आदमपूरकर,बँक सहाय्यक महमदरफी मदार,रेश्मा मदार,समीरा शेख,

शेख अजिमोद्दीन,शेख फारूक, शेख इरफान,राजू फोटोग्राफर बच्चे कंपनी शेख फरहान,अदिबा  आदमपूरकर,आमेरा मदार, 

अमान मदार,सर्वज्ञ पाटील,

दस्तगीर शेख,गौस शेख,

अनुष्का नागेश्वर,श्रेयांश नागेश्वर, 

गौतम कांबळे,व्यंकट अनपलवार,

सोहम अनपलवार,गोल्या सुनेवाड,माहीन शेख,मुख्तार शेख आदी प्रतिष्ठित नागरिक व लहान मुलांची भरगच्च उपस्थिती होती.