महाराष्ट्र ग्रामीण न्युज प्रतिनिधी विजय अधिकार
श्रीराम सेवा भजन मंडळाच्या ७५ वर्षांच्या भक्तीपरंपरेचा अमृतमहोत्सवी टप्पा जव्हार येथील श्रीराम सेवा भजन पुरुष मंडळीच्या वतीने श्रावण महिन्यानिमित्त शहर व परिसरातील तब्बल १३ मंदिरांमध्ये अखंड भजन कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेशजी वनमाळी तसेच अनिल दावणे यांच्यासह भजनी मंडळीतील सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
श्रीराम सेवा भजन मंडळाने यंदा आपल्या ७५ वर्षांची भक्तीमय परंपरा पूर्ण केली आहे. या अमृतमहोत्सवी वाटचालीबद्दल मंडळाच्या सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पुढील काळात विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवून भजनी मंडळी अधिक व्यापक व संघटित करण्याचा संकल्प करण्यात आला.
श्रावणमासातील अखंड भजनामुळे १३ही मंदिरांमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले. मंडळाच्या ७५ वर्षांच्या परंपरेचे जतन करत नव्या पिढीलाही भजन व संस्कृतीशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.





Social Plugin