आज दिनांक 08 सप्टेंबर 2025 वार मंगळवार ला विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज,महारचिकना. येथे शाडू माती पासून गणपती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती .या कार्यशाळेमध्ये इयत्ता पहिली ते नववी पर्यंतचे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या कार्यशाळेमध्ये मेहकर येथील प्रसिद्ध कलाशिक्षक श्री. रामेश्वर तोंडे सर उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी श्री . रामेश्वर तोंडे सरांनी शाडू माती पासून प्रदूषण मुक्त गणपती बनवण्याची कला विद्यार्थ्यांना शिकवली. विद्यार्थ्यांनी सुद्धा या कार्यशाळेमध्ये अतिशय आनंदाने सहभाग घेतला.
आज आपल्या विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज,महारचिकना. मध्ये शाडूच्या गणपतीची कलाकृती करून विद्यार्थ्यांनी ती जोपासावी. जेणेकरून प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती बाजारातून नाहीसे होऊन. शाडू मातीचे गणपती घरोघरी बसवावे व निसर्गाला थोडा हातभार लावावा हा या कार्यशाळे मागचा उद्देश होता...
.jpg)




Social Plugin