

शहादा दिनांक २५/९/२०२६
अशोक पाटील मलोनी (ग्रामीण प्रतिनिधी )
कलसाडी , तालुका शहादा,येथील सर्व महानुभाव पंथीय सर्वज्ञ् पासक यांच्या विद्यमाने आयोजित श्री गोविंद प्रभू अवतार दिन २७ वा महोत्सवानिमित्त कलसाडी गावातून दिनांक २४/०९ /२०२६ रोजी भव्य रॅली काढण्यात आली.या भक्तिमय रॅली मध्ये भाविकांनी मोठया उत्साहाने सहभाग घेतला तसेच दिनांक २५/०९/२०२६ रोजी श्री गोविंदप्रभू अवतार दिन साजरा करण्यात आला.
या महोत्सवाच्या निमित्ताने प पू प म आलेगाव येथील आक्काबाईजी तसेच तत्त्वदर्शी वचन सर्विता आचार्य प्रवर श्री मोठेबाबा, शहादा तसेच लोणखेड येथील निवासी पातूरकर बाबा फेस येथील वैरागी बाबा आणि पंचक्रोशीतील उपस्थित संत-महंत तसेच समस्त भाविकांचे कलसाडी नगरीत हार्दिक स्वागत करण्यात आले.
यावेळी. श्री गोविंद प्रभू यांचा पवित्र विचारांचा आणि मानवतेचा संदेश जनमानसात पोहोचवणारा हा भक्तिमय सोहळा मोठ्या श्रद्धा, उत्साह आणि आनंदात साजरा करण्यात आला.




Social Plugin