Ticker

6/recent/ticker-posts

हणमंतवाडी (अं बु) गावातील ग्रामसेवक बेपत्ता; ग्रामस्थांचे हाल, प्रशासनाचे दुर्लक्ष!



निलंगा तालुक्यातील हणमंतवाडी (अं बु) येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक नियमित येत नसल्याने गावातील विकासकामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामसेवक गावात फिरकलेच नसल्याने ग्रामस्थांना विविध दाखले आणि दाखल्यांसाठी चकरा माराव्या लागत आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामसेवक कार्यालयात हजर न राहिल्यामुळे नागरिकांना घरपट्टी, पाणीपट्टी भरणे, तसेच जन्म-मृत्यूचे दाखले, उत्पन्न दाखले मिळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. शेतकरी, विद्यार्थी आणि वृद्धांना छोट्या-छोट्या कामांसाठी दिवसभर ताटकळत राहावे लागत आहे.या संदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा विचारणा केली असता, समाधानकारक उत्तर मिळत नाही. "आम्ही कामासाठी येतो पण कार्यालय कुलूपबंद असते किंवा ग्रामसेवक जागेवर नसतात," अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.जर येत्या काही दिवसांत ग्रामसेवकाची नियुक्ती नियमित झाली नाही आणि गावातील व्यवस्था सुधारली नाही, तर पंचायत समिती निलंगा येथे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हणमंतवाडी (अंबु)येथील ग्रामस्थांनी दिला आहे. आता यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.