Ticker

6/recent/ticker-posts

पावसाअभावी पिकांचे नुकसान; पाच एकर सोयाबीन उपटून बांधावर



केरबा गवते माजलगाव

सांडस चिंचोली शिवारा : पावसाने दडी मारल्यामुळे सांडस चिंचोली परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पावसाअभावी सोयाबीन पिकाची वाढ खुंटल्याने आणि पीक हातातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने एका शेतकऱ्याने तब्बल पाच एकर सोयाबीन पीक उपटून बांधावर टाकले आहे.

पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असून, उत्पादन खर्चही निघणार नसल्याची भीती व्यक्त होत आहे. यंदाच्या हंगामात पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

शासनाने पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व आवश्यक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.