Ticker

6/recent/ticker-posts

गुरुपिंपरी शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड



कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी 

दिनाक: 12 सप्टेंबर 2026

घनसावंगी : तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा गुरुपिंपरी, केंद्र राणिउंचेगाव येथे शनिवार, दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी पालक सभा घेऊन शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली. सर्व पालक व उपस्थित मान्यवरांच्या विचारविनिमयातून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात समितीची बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवडीत अध्यक्षपदी काकासाहेब ज्ञानेश्वर कोल्हे, तर उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाराजी कोल्हे यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून नंदू धर्मराज गायकवाड, नीता भागवत कोल्हे, सविता भाऊसाहेब साबळे, कृष्णा नारायण कोल्हे, अनिरुद्ध आप्पासाहेब कोल्हे, संगीता रवींद्र चिंतामणी, वर्षा विष्णू वाघमारे आणि योगेश सुभाषराव कोल्हे यांची निवड झाली.

तसेच सहशिक्षक तौर सर यांची सहकार्याची जबाबदारी असून, मुख्याध्यापक तुषार लोंढे सर यांची समितीच्या सचिवपदी निवड करण्यात आली.

यावेळी शाळेच्या शैक्षणिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता, नियमित उपस्थिती, शाळेतील विविध उपक्रम आणि पालकांचा शाळेतील सहभाग याबाबत चर्चा करण्यात आली. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या कार्यक्रमासाठी गावातील शहाजी नाना कोल्हे, संतोष कोल्हे, अमोल कोल्हे, विनोद भाऊ कोल्हे, ज्ञानेश्वर कोल्हे, गणेशराव कोल्हे, राजकुमार कोल्हे, परमेश्वर कोल्हे, सुनील कोल्हे, शेखर कोल्हे, अनिल कोल्हे, विजय कोल्हे आणि महेश कोल्हे यांच्यासह पालक व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पालक, ग्रामस्थ व मान्यवरांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.