बडा अलावा येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; ४९ गणेश मंडळांचा सहभाग
सैय्यद मज़हर अली @ अकोट प्रतिनिधी
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या अकोट शहरात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात तसेच गुलाल आणि फुलांची उधळण करत भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. ४९ गणेश मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे मिरवणूक शांततेत पार पडली.
बडा अलावा चौकात काँग्रेसच्या नगरसेविका नगमा शेख यांच्यासह उपस्थितांनी श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले.
दरम्यान, पटेल चौकात रस्त्यावर लोंबकळणाऱ्या इंटरनेट केबलमुळे मोठ्या गणेशमूर्तीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. नागरिकांच्या तत्परतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली.
यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आगामी सणांमध्ये ध्वनी मर्यादेचे पालन करण्याचे आवाहन केले. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करणाऱ्या पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.





Social Plugin