रात्रीच्या अंधारामुळे भाविक व ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न; प्रशासनाने चौकशी करण्याची मागणी
भीमाशंकर : धार्मिक व पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या भीमाशंकर परिसरातील काही पथदिवे गायब झाल्याचे अथवा तुटलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे परिसरातील रात्रीची प्रकाशव्यवस्था प्रभावित झाली असून, भाविक, पर्यटक व स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हे पथदिवे नेमके तुटले आहेत की चोरीला गेले आहेत, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. संबंधित प्रशासनाने याची तातडीने पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, तसेच खराब किंवा गायब झालेले पथदिवे त्वरित दुरुस्त अथवा बसवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
परिसरातील प्रकाशव्यवस्था सुरळीत करून भाविक व नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






Social Plugin