Ticker

6/recent/ticker-posts

सोनपेठ तालुका दुष्काळ पाहाणी दौरा

 


 सोनपेठ ( प्रतिनिधी ) शिवशंकर तुपकर  दि. 26-09-2026 

सोनपेठ तालुक्यातील नरवाडी, चुकारपिंपरी, सायखेडा, वंदन येथे पावसाचा खंड झाल्यामुळे कोरडा दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. आज प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी बांधवांच्या व्यथा जाणून घेतल्या. या कठीण प्रसंगी शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

आपत्ती ही टाळता येत नाही, पण शेतकरी व जनतेला योग्य वेळी मदत पोहोचवणे ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे. या संकटकाळी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही त्यांच्या नुकसान भरपाईसाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले.

यावेळी प्रशासकीय अधिकारी, विविध गावचे सरपंच, युवक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नुकसानग्रस्त शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते...!