Ticker

6/recent/ticker-posts

मुख्याधिकारी शशिकांत बाबर यांचा उर्दू शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद



पत्रकार सैय्यद मज़हर अली अकोट प्रतिनिधी 

अकोट : ‘एक वर्ग ऐसा भी’ या उपक्रमांतर्गत अकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी शशिकांत बाबर यांनी उर्दू शाळा क्र. ३ ला सदिच्छा भेट दिली. त्यांनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले आणि मोठे ध्येय ठेवण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी वर्गखोल्या, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधेची पाहणी केली. उपस्थित पालक व समाजसेवक मोहम्मद अझहर यांनी शाळेतील पायाभूत सुविधा व दुरुस्तीबाबत अडचणी मांडल्या. बाबर यांनी या समस्यांवर लवकरच उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी प्रशासन अधिकारी तेजस हागोने, सरफराज परवेज, शिक्षक आणि पालक उपस्थित होते. प्रशासनाच्या या थेट संवादामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले