नाशिकहून मनमाड व परिसरातील दुष्काळी भागाच्या दौऱ्यासाठी जात असताना पिंपळगाव जवळ ट्रक व
मालवाहू गाडीचा भीषण अपघात झाल्याचे *राज्याचे मंत्री ना. गिरीश महाजन* यांच्या निदर्शनास आले.
मंत्री महाजन यांनी क्षणाचाही विलंब न करता आपला ताफा थांबवला व दोन्ही वाहनातून जखमींना बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही, मात्र काहीजण गंभीर जखमी झाले होते.
जखमींना तातडीने रुग्णालयात रवाना करून संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना फोनवरून आवश्यक उपचाराच्या सूचना देखील मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या आहेत. त्यांच्या या तत्परतेमुळे जखमींना वेळेवर मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला.





Social Plugin