जव्हार : प्रतिनिधी विजय अधिकार, महाराष्ट्र ग्रामीण न्यूज, दिंनाक 06/09/2026
जव्हार येथील प्रगती प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थी व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
धार्मिक उत्सवाचे औचित्य साधून प्रवचन, कीर्तन तसेच धार्मिक गोष्टींच्या माध्यमातून संस्कारमूल्यांचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच संस्कृती, परंपरा व धार्मिक मूल्यांची जपणूक करण्याची प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात दहीहंडी उत्सवाची सांगता करण्यात आली.






Social Plugin