Ticker

6/recent/ticker-posts

मेहकर, सिंदखेडराजा, जिल्हा -बुलढाणा. अन्न व नागरी पुरवठा विभागाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई!


राज्यस्तरीय दक्षता पथकाचा सर्जिकल स्ट्राईकअवैध बायोडिझेल साठ्यासह तब्बल २१ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त

मन्सूर शहा.:-----मेहकर, सिंदेखेडराजा बुलढाणा:

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने अवैध बायोडिझेल वापराचा पर्दाफाश केला आहे.वृंदावन लॉन्स जवळ, हॉटेल बंजाराच्या समोर, छत्रपती शिवाजी महाराज बायपास रोडवरील मोकळ्या जागेत, मेहकर, जि. बुलढाणा) व दुसरबीड गाव, हॉटेल गावकरी फॅमिली रेस्टॉरंटच्या समोर, सिंदखेडराजा, बुलढाणा येथे सुरू असलेल्या अवैध बायोडिझेल पंपावर धडक छापा टाकण्यात आला.

या धडक दोन्ही कारवाईत २१ लाख ६९ हजार  रुपये किमतीचे एक मालमोटार ट्रकसह बायोडिझेल सदृश्य पेट्रोलियम द्रव पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे.

नियंत्रक शिधावाटप व राज्यस्तरीय दक्षता पथकाचे प्रमुख चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने घटनास्थळावरून Ashok Leyland कंपनीचा ट्रक,  भूमिगत लोखंडी टाक्या, डिस्पेन्सर युनिट, डिझेल साठा, पाईप व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला.

**जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत' गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु; पोलिसांकडून तपास चक्र वेगवान**

सदरचा बायोडिझेल सदृश्य पेट्रोलियम द्रव पदार्थाचा हा अवैधसाठा नेमका कोठून आणण्यात आला होता? याचा छडा लावण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर **जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत (Essential Commodities Act)** गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्थानिक पोलीस आणि पुरवठा विभागाचे पथक पुढील तपास अत्यंत गतीने करत आहे.

या कारवाईत राज्य दक्षता पथकातील उपनियंत्रक शिधावाटप अंमलबजावणी श्री गणेश बेल्लाळे, सहायक नियंत्रक शिधावाटप श्री प्रदीप काळे, मुख्य निरीक्षण अधिकारी श्री नागनाथ हंगरगे तसेच, शिधावाटप निरीक्षक सर्वश्री. राजेश सोरते, अरुण काते, विकास नागदिवे, पवन कुंभले, रविंद्र राठोड, राजीव भेले, देवानंद थोरवे, रामराजे भोसले, दिपेंद्र परूळेकर, अमोल बुरटे, चंद्रकांत कांबळे, राहूल इंगळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री नहुशकुमार बोरोडे, शुभम फाले, पुरवठा निरीक्षक, विवेक जगताप, सुनील झाल्टे, गोदाम लिपिक विशाल लोखंडे सहभागी होते.

अशा प्रकारच्या अवैध इंधन आणि गॅस तस्करांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा चंद्रकांत डांगे (भा.प्र.से.) यांचेकडून  देण्यात आला आहे.