ग्रामीण प्रतिनिधी.
महमदरफी मदार आदमपुरकर
बिलोली तालुक्यातील आदमपूर येथे बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बैलाच्या अंगावर रंगबेरंगी फुलांच्या माळा, घुंगरू, गोंडे, इत्यादी साहित्य लावण्यात आले होते.
यावेळी बळीराजाने आपल्या सर्जा-राजाला नटून थटून
हनुमान मंदिराकडे आणले होते. यावेळी बैलपोळ्याचे मानकरी रामचंद्र माणिकराव माली पाटील यांनी श्री हनुमान रायाची विधीवत पूजा करून आरती करून बैलाच्या मिरवणूक सुरुवात केली.
मानकरींच्या बैलांच्या पाठीमागे सर्व गावातील बैल जोडी मारुती मंदिर, महादेव मंदिर, दत्तात्रय मंदिरासह विठ्ठल रुक्मिणी मंदिर भोवताली मोठ्या
थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर बळीराजाने घरी पूजा नैवेद्य व बैल जोडीचे लग्न लावण्यात आले.
दरम्यान यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर मात्र चिंतेचे सावट दिसून आले. एवढ्या चिंतेत असताना सुद्धा बळीराजा मात्र आपल्या बैल जोडीला सजवून नटून थटून होते.
यावेळी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने हनुमान मंदिराकडे जणू जत्रेचे स्वरूप होते. यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, माजी चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिसांच्या वतीने परिसरात कडकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.





Social Plugin